रायगड जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाची जिल्हा स्तरावर एक संघटना असावी याबाबत विचारविनिमय करण्यासाठी प्राथमिक सभा खोपोली येथे दिनांक 4 मार्च 1990 रोजी पेण ब्राह्मण सभेचे त्यावेळेचे अध्यक्ष श्री माधवराव मंडलिक यांचे अध्यक्षतेखाली सभा झाली. त्यावेळी एक अस्थायी समिती स्थापन करण्यात आली.
याबाबत तर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी दिनांक 8 एप्रिल 1990 रोजी श्री. रामेश्वर देवस्थान पेण येथे जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींची व हितचिंतकांची एक सभा घेण्यात आली होती. या सभेस जिल्ह्यातून शंभर प्रतिनिधी उपस्थित होते.
या सभेत ब्राह्मण समाजाची जिल्हास्तरावर एक संघटना असावी का? या बाबतीत सविस्तर चर्चा होऊन रायगड जिल्हा ब्राह्मण सभेची स्थापना करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला व तीन वर्षासाठी खालील पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष: श्री माधवराव मंडलिक पेण
उपाध्यक्ष: श्री दीपक बाम, खोपोली
खजिनदार: श्री अनिल गोगटे, कर्जत
सेक्रेटरी: श्री प्रदीप मोने, पेण
सदस्य म्हणून म्हणून 21 जणांची निवड करण्यात आली या सभेत घटना तयार करण्यासाठी घटना समितीची निवड करण्यात आली. यात श्री चिंतामणराव जोशी, नागाव ऍड. अशोक रंगनाथ जोशी, पनवेल श्री. भाऊसाहेब नेने, पेण श्री. विजय परांजपे, रोहा श्री. अ. म. ओक, चौल यांची निवड करण्यात आली.
निरनिराळ्या ब्राह्मण समाजाच्या घटनांचा अभ्यास करून घटना समितीने घटनेचा मसुदा तयार केला. त्याप्रमाणे संस्थेचे कार्य 1999 पर्यंत चालू होते. संस्था नोंदणीकृत असावी म्हणून 1999 मध्ये संस्था रायगड जिल्हा ब्राह्मण संस्था या नावाने नोंदण्यात आली असून. आजपर्यंत या संस्थेचे कार्य व्यवस्थित चालू आहे.