Welcome to Raigad Zilla Brahman Sanstha
संकेतस्थळाविषयी अध्यक्षांचे मनोगत
|| जय परशुराम…||
रायगड जिल्हा ब्राह्मण संस्थेमध्ये आपले स्वागत आहे
आपल्या रायगड जिल्ह्यात १९९० पूर्वीपासून जिल्ह्यातील गांव पातळीवर, तालुका पातळीवर वेगवेगळ्या ब्राह्मण संस्था कार्यरत होत्या. त्यांचे काम ठराविक विभागापुरते मर्यादीत होते. १९९० च्या सुमारास यासर्व संस्थाना एकसंधपणे काम करता यावे, सर्वाना जोडणारा एक मजबूत धागा असावा या उद्देशाने जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यक्तीनी पुढाकार घेऊन “रायगड जिल्हा ब्राह्मण संस्था” या संस्थेची स्थापना केली व तशी नोंदणी करुन घेतली. आज आपल्या संस्थेशी जिल्ह्यातील बहुतांश संस्था संलग्न आहेत. यासर्व संस्थांशी आपला संस्थेच्या सभेच्या निमीत्ताने संपर्क असतोच. मध्यंतरीच्या काळात आपली संस्थाही काळाबरोबर रहावी आणि त्यासाठी आपल्या संस्थेची वेबसाईट असावी असा विचार प्रबळ होऊ लागला. खरेतर दोन वर्षापूर्वीपासूनच यावर विचार सुरु होता, परंतु दोन वर्षाच्या कोरोना काळामुळे त्याल मूर्त स्वरुप येऊ शकले नाही. अखेरीस विद्यमान कार्यकारीणीने निर्णय घेउन आज आपण आपली वेबसाईट आज वितरीत करीत आहोत.
या वेबसाईट मुळे आता आपण थेट जागतीक पटलावर जाणार आहोत आणि बरोबरच आपली जबाबदारी सुद्धा वाढणार आहे. या वेबसाईट मधे आपण वेगवेगळे विभाग केले आहेत. जेणेकरून आपल्याला रायगड जिल्हा ब्राह्मण संस्थेबद्दल अधिक जाणून घेता येईल. या वेबसाईट मध्येपौरोहीत्य, समाजातील वैद्यकीय व्यावसायीक, वकील, रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, तेथे असलेली निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था अर्थात ब्राह्मण व्यावसायीक.
या सर्व विषयांकरीता वेगवेगळे विभाग असतील. शिवाय संस्थेच्या आजीव सभासदांची यादी, कौटुंबिक सूची वगैरे ईतर विभागही पहायला मिळतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील व्यावसायीकांना देणगी मूल्य देउन आपल्या व्यवसायाची माहीतीही या वेबसाईटवर टाकता येईल त्याकरीता संस्थेच्या मेल वर आपल्या व्यवसायाची माहीती पाठवावी.
संस्थेचा इ-मेल:- rzbs.pen@gmail.com
संपर्क क्रमांक:- +918080365646
धन्यवाद…
आपलाच
शरद म्हसकर